Pimpri : शिवांजली कार्यक्रमात शिवतांडव नृत्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद

एमपीसी न्यूज -निगडीतील नृत्यकला मंदिरच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त शिवांजली हा भरतनाट्यमच्या रचनांचा पारंपरिक कार्यक्रम आयोजित केला होता. विविधांगी शंकराचे नृत्य सादर करुन रसिकांची मने जिंकली.

निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात नृत्यकला मंदिरच्या संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी “शिवस्तुती” हे नृत्य सादर केले. त्यांना गौरी घाडगे आणि अमृता काकडे या विशारद विदयार्थ्यांनी नृत्यसाथ केली. राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविलेली विद्यार्थिनीने “नटेश कौटुकम” ही नृत्य रचना श्रध्दा कोरे सादर केली.

  • “शिव कीर्तनम ” हर्षा औटी, अंजली औटी, संस्कृती मगदुम या विद्यार्थ्यांनी मनमोहक अशी नृत्य करुन रसिकांची दाद मिळविली. तर कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे “म्हणती महादेव भोळा” हे पार्वतीची व्यथा मांडणारा पदम नृत्य संस्थापिका तेजश्री अडिगे यांनी सादर करुन रसिकांची मने जिंकली.

शिवाचे संहारक हे शिवाचे रुप दाखविणारी “शिव तांडव” ही नृत्य रचना राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळविवलेल्या विद्युलता खत्री या विद्यार्थिनींने सादर केली. तसेच “तिल्लाना” हे नृत्य सर्व विद्यार्थ्यांनी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकरिता खास आयोजित केला होता. यास रसिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.