Crime News : नातेवाईक तरुणाकडूनच पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून नात्याला काळीमा फासणारा एक प्रकार उघडकीस आला आहे. एका 25 वर्षीय तरुणाने पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपी तरुण हा पीडित तरुणीचा नातेवाईकच आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. पीडित चिमुरडीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादीच्या मावस बहिणीचा मुलगा आहे.पीडित चिमुरडी ही मावशीकडे राहत असताना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला.याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या मम्मीला कापून टाकील अशी धमकीही त्यांनी दिली होती. त्यामुळे घाबरलेल्या पीडित चिमुरडीने याबाबत कोणालाही काही सांगितले नव्हते.परंतु त्रास होऊ लागल्याने तिने आपल्या आईला घडलेला हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली. लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.