Pune : पुण्यात दुमजली घराचे छत कोसळून 50 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी 

एमपीसी न्यूज : राज्यातील अनेक भागात मॉन्सूनच आगमन झाल असून मागील दोन दिवसापासून शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्याच दरम्यान कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळून 50 वर्षीय व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.


Pune – समर्थ रामदास स्वामींचे तात्त्विक चरित्र साहित्य अकादमीकडून मराठीत प्रकाशित

स्टॅनली डिसोझा (वय 50) व्यक्तिचा मृत्यू झाला. तर जेरी डिसोझा साठ वर्षीय वयोवृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे नाव आहे. अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प (Pune) परिसरातील 830 दस्तुर मेहेर रोड येथील दुमजली घराचे छत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोसळले.

त्यावेळी घरामध्ये जेरी डिसोझा आणि स्टॅनली डिसोझा हे दोघेजण होते. त्या घटनेमध्ये स्टॅनली डिसोझा यांच्या डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

तर जेरी डिसोझा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळील रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.