Khed : खेडमध्ये ओढ्याच्या काठावर लावलेली दारूभट्टी उध्वस्त

एमपीसी न्यूज – खेड (Khed) तालुक्यातील कोयाळी गावात एका ओढ्याच्या कडेला लावलेली दारूभट्टी गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी उध्वस्त केली. ही कारवाई सोमवारी (दि. 19) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

 Pune : चौथा स्तंभ पञकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी यांना सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी रणजित इंगळे हत्या प्रकरणी चौकशीची मागणी

पोलीस अंमलदार योगेश्वर कोळेकर यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी ओढ्याच्या काठावर भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत एक लाख रुपये किमतीचे दोन हजार लिटर कच्चे रसायन नष्ट केले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.