Yerwada : पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीस अधिकाऱ्यासह भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पतीने इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले तर दिराने घरात कोणी नसताना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक असलेल्या पतीसह त्याच्या भावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा (Yerwada) पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
त्यानुसार या महिलेचा पती, दिर, सासू यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचा पती वाशिम येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे. 2015 पासून आज पर्यंत वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी भादवी 498 अ 377 376 323 504 506 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीच्या पतीने त्यांच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवले. त्याला विरोध केला असता मारहाण केली. तर घरात कोणी नसताना या महिलेच्या दिराने फिर्यादी सोबत दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तर इतर आरोपींनी बाहेरून पैसे घेऊन यावे यासाठी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.