Pimpri : ज्येष्ठांसाठी सुखकर सहजीवनाचा दुसरा डाव मधून घडला आगळावेगळा परिसंवाद

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या ‘आश्वस्त सर्विसेस’ (Pimpri) च्या वतीने एकल ज्येष्ठांसाठी ‘सुखकर सहजीवनाचा दुसरा डाव’ हा आगळावेगळा परिसंवाद रविवारी ( दि. 17) निवारा सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता.

Moshi : मोशीतील कचरा प्रकल्पाची विद्यार्थ्यांनी घेतली माहिती

जोडीदाराच्या वियोगानंतर विशेषत: उतारवय सुरू होतं तेव्हा येणारं एकाकीपण निभावणं खूप अवघड असतं. त्यावर उपाय म्हणून अलिकडे पुनर्विवाहाबरोबरच लिव्ह इन चा पर्याय पुढे येत आहे. मात्र, त्याबाबत सामान्य माणसाच्या मनात भीती, संकोच, शंका असणं स्वाभाविक आहे. हेच जाणून आश्वस्तने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

गेली अनेक वर्षे लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका सरीता आवाड, ज्येष्ठांसाठी विवाह मंडळ चालवणारे माधव दामले व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. नीलिमा म्हैसूर यांनी यातील मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकला.

आवाड यांनी ठामपणे ‘नातं निभावता आलं नाही, तर बाहेर पडण्याची व्यवस्था सहज असल्याने ज्येष्ठांनी लिव्ह इनचा विचार करावा’ असं मत मांडलं. अॅड. म्हैसूर यांनी विवाहात असणारं कायद्याचं संरक्षण लिव्ह इनमध्ये त्यामानाने मर्यादित असतं, हे नमूद करतानाच त्यातील इतर धोकयांची जाणीव करून दिली.

दामले यांनी जमवलेल्या ज्येष्ठांच्या जोड्यातील बहुतेक जण विवाहबद्ध झाल्याचे सांगितले. मात्र पन्नाशी-साठीत एकाकीपण आलेल्या तरुण ज्येष्ठांना त्यांनी पुनर्विवाह करा, अथवा लिव्हइन मध्ये रहा, पण एकटे राहू नका, असा सल्ला दिला. आश्वस्तने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचना सर्व मान्यवरांनी केली. आश्वस्तच्या सह-संस्थापक प्रीति दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आश्वस्तच्या सह-संस्थापक शीतल वैद्य यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना कवडी यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभार प्रकटन क्षितिजा नरवणे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.