Chikhali Crime : टोळक्याने केला एकाच्या खुनाचा प्रयत्न; 5 मोटरसायकल फोडल्या

एमपीसी न्यूज – चिखलीमधील मोरेवस्तीमध्ये  (Terrorizing in Chikhali) चार जणांच्या टोळक्याने एकाचा खून करण्याचा प्रयत्न करून आणि 5 मोटरसायकल फोडून शिवीगाळ व दमदाटी करीत 13 जूनला दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

खवचे अज्या उर्फ अजय भारत जाधव (वय 23 वर्षे, रा. भावे हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली), पपड्या उर्फ अजय शामराव सोनवणे, (वय 24 वर्षे, दत्त हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती चिखली) (Terrorizing in Chikhali) व त्यांच्या सोबत आणखीन एक जण असून त्याचा नाव पत्ता माहित नाही, असे 3 आरोपी आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी रुपेश प्रमोद ठाकूर ( वय 24 वर्षे, रा. मोरेवस्ती चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शिवकृपा हौसिंग सोसायटीजवळ 13 जूनला संध्याकाळी 7.40 वा घडली.

Municipal Encroachment Squad : नोटीस न देताच घरी जात महापालिका अतिक्रमण पथकातील अधिका-यांची दमदाटी, पोलिसांत तक्रार

ठाकूर व त्यांचे मित्र लखन बसवराज गाडेकर यांनी आरोपींविरुद्ध चिखली पोलिस ठाण्यात 15 एप्रिलला फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे चिडून जाऊन आरोपींनी आपापसात संगनमत करून दुचाकीवार ट्रिपल सीट बसून आले.

पपड्या आणि त्यांचा मित्राने ठाकूरचे हात पकडून ठेवले व जाधवने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.जाधवने फिर्यादीला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर तीन वेळा वार केले. ते वार फिर्यादीने हुकवले परंतु तिसरा वार हुकवत असताना तो फिर्यादी यांच्या खांद्याला लागून दुखापत झाली.

फिर्यादी त्यांच्या तावडीतून पळून गेल्याने त्यांनी फिर्यादीची मोटरसायकल (MH14 GB7955) होंडा शाईन, फिर्यादीच्या आईची मोटरसायकल (MH14 HN2814), सिद्देश्वर करताडे याची मोटरसायकल (MH14 जेक्यू 3454) व आणखी 2 मोटरसायकल त्या कोणाच्या आहेत, हे माहित नाही. या 5 गाड्यांवर कोयत्याने व दगडाने मारून गाडया फोडून, शिवीगाळ व दमदाटी करत त्यांचे नुकसान केले व दहशत निर्माण केली.

याप्रकारणी तिघा आरोपीविरोधात आर्म ॲक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.