Wakad : बेकायदेशीररित्या मद्य बाळगणाऱ्या पत्रकाराला अटक

एमपीसी न्यूज – पत्रकार असलेल्या ओळखपत्राचा गैरवापर करून एकाने बेकायदेशीररित्या मद्याच्या बाटल्या बाळगल्या. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या   पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास ताथवडे चौकात करण्यात आली आहे.

सतीशकुमार विश्वनाथ बोगिले (वय 30, रा. गणेशनगर, वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई एस एस गावंडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींने त्याच्याकडे असलेले प्रेस रिपोर्टरच्या ओळखपत्राचा गैरवापर केला. आरोपीने ओळखपत्र वापरून 14 हजार रुपये किमतीच्या 14 दारूच्या बाटल्या बेकायदेशीररित्या स्वतःजवळ बाळगल्या. तसेच ताथवडे चौक येथे रस्त्याच्या बाजूला त्याने नागरिकांची गर्दी केली.

यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली. याबाबत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी सतीशकुमार याला बेड्या ठोकल्या. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.