Creditcard Fraud: क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा ‘या’ अभिनेत्याला बसला फटका

Actor Mohammad Nazim has become a victim of credit card fraud मी माझा फोन पाहत असताना काही मेसेज बघत होतो. यात माझ्या खात्यातून पैसे काढल्याचं एक नोटिफिकेशन मला दिसलं. हा मेसेज पाहून मी चक्रावून गेलो.

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या साथीमुळे सध्या रोखीच्या व्यवहारांपेक्षा ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे. सरकारनेदेखील जास्तीत जास्त व्यवहार कॅशलेस करावेत असे आवाहन केले आहे. पण याचा फायदा घोटाळेबाज घेत आहेत. छोट्या पडद्यावरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेतील अभिनेता मोहम्मद नाझिम याला क्रेडिट कार्ड घोटाळ्याचा फटका बसला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला माहिती देताना मोहम्मद नाझिम म्हणाला की, ‘सवयीप्रमाणे मी फोन चेक करत असताना माझी फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं.

मी माझा फोन पाहत असताना काही मेसेज बघत होतो. यात माझ्या खात्यातून पैसे काढल्याचं एक नोटिफिकेशन मला दिसलं. हा मेसेज पाहून मी चक्रावून गेलो. कारण हे पैसे माझ्या क्रेडिट कार्डवरुन काढण्यात आले होते.

विशेष म्हणजे मी खूप दिवसांपूर्वी क्रेडिट कार्डचा वापर केला होता, आणि यावेळी आलेलं नोटिफिकेशन काही दिवसांपूर्वी कार्ड वापरल्याचं होतं’, असं मोहम्मद म्हणाला.

पुढे तो म्हणतो, ‘सध्या मी माझ्या पंजाबमधील घरी आहे. जेव्हा मी मुंबईत असतो तेव्हाच क्रेडिट कार्ड वापरतो. मात्र कार्डचा फारसा वापर होत नसल्यामुळेच फार उशिरा मला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं’.

फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर मोहम्मदने तात्काळ बॅक खात्यातील रक्कम चेक केली. मात्र तोपर्यंत त्याच्या खात्यातून पैसे काढण्यात आले होते. याप्रकरणी त्याने बँकेकडे याविषयी तक्रार केली आहे.

तसंच त्याचं खातंही सील केले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद नाझिम छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे.

त्याने स्टार प्लस या वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत ‘एहम’ ही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यने गोपी बहू ही भूमिका वठविली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.