Pune : ठराविक बांधकाम व्यावसायिकांसाठी 323 रस्त्यांचे रुंदीकरण : शिवसेना

Widening of 323 roads for certain builders: Shiv Sena

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील 323 रस्त्यांचे 9 मीटर रुंदीकरण करण्याचे नियोजन ठराविक बांधकाम व्यवसायिकांसाठी तयार केल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

या रस्त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांच्या मिळकती ह्या बांधकाम योग्य राहणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार आहे.

त्यामुळे सर्वसामान्य पुणेकरांचे हित लक्षात घेऊन शासनाच्या नगरविकास मंत्रालयाच्या माध्यमातून एमआरटीपी 154 प्रमाणे निर्देश देऊन तात्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

पुणे शहरात येणाऱ्या युनिफाईड डिसी रुलमध्ये या 6 मीटर रस्त्यांवर टीडीआर वापरण्याची तरतूद अनुज्ञेय करावी. शहर विकासाच्या व सर्वसामान्य पुणेकरांच्या दृष्टीने व सर्व नागरिकांना न्याय मिळेल, असा 6 मीटर रस्त्यांवर टीडीआर पूर्वीप्रमाणे तरतूद पुन्हा अमलात यावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांना शहरप्रमुख संजय मोरे, सहसंपर्कप्रमुख शाम देशपांडे, अजय भोसले, प्रशांत बधे, गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे. पुणे महापालिकेत 2017 पासून भाजपची सत्ता आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांनी सर्वसामान्य पुणेकरांवर 6 मीटर टीडीआर वापरला मनाई करून अन्याय केला आहे.

पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना नागरिकांपेक्षा बांधकाम व्यावसायिकांचे हित पहिल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.

दरम्यान, मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत 323 रस्ते रुंद करण्याच्या प्रास्तावावर चर्चा होणार आहे. त्याला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मानसेतर्फे विरोध करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.