Pune: शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या- चेतन तुपे

Pune: Give top priority to student safety while starting school- MLA Chetan Tupe त्याचबरोबर शाळेच्या परिसराची स्वच्छता, वर्ग स्वच्छता व टॉयलेटची स्वच्छता याच्यासाठी धोरण असावे.

एमपीसी न्यूज- शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या, असे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.

सोमवारी (दि.8) महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या बरोबर महाराष्ट्रातील आमदारांची शालेय धोरण व शाळा सुरू करण्याच्या संदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटिंग झाली. त्यामध्ये चेतन तुपे यांनी विविध सूचना केल्या.

महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या झोनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विभागवार निर्णय व्हावेत, त्या विभागातील परिस्थिती पाहून शाळा चालू करण्यासाठी निर्णय घ्यावेत, असे मत मांडून प्रामुख्याने शाळा जुलैनंतर चालू कराव्यात, त्या टप्प्याटप्प्यानं चालू कराव्यात, प्रथम माध्यमिक विभाग सुरू करावा, त्याच्यानंतर प्राथमिक विभाग चालू करावा व त्यानंतर पूर्वप्राथमिक चालू करावी अशी मागणी केली.

त्याचबरोबर शाळेच्या परिसराची स्वच्छता, वर्ग स्वच्छता व टॉयलेटची स्वच्छता याच्यासाठी धोरण असावे. तसेच पालकांना व पी.टी.ए (PTA) मेंबरला विश्वासात घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करून मगच शाळा सुरू करण्याचा निर्णय करावा असेही मत व्यक्त केले.

शाळा सुरू झाल्यानंतर शहरातील बहुतांशी मुले ही बसेस-रिक्षा यांनी शाळेत येतात त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळले जाणार, यासंदर्भात सुद्धा धोरण निश्चिती करण्याची गरज आहे ही सूचना केली.

स्थानिक प्रशासनाला यामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्यामार्फत साबण निर्जंतुकीकरण व त्यांनी सॅनिटायझरचा पुरवठा शाळांना करावा अशी मागणी यावेळी नोंदवली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.