Lip Filler: ओठांवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय चुकला, ‘या’ अभिनेत्रीची कबुली

actress sara khan speaks on her lip filler surgery

एमपीसी न्यूज- कृत्रिमपणे लीप फिलरचा वापर करुन ओठांना सेक्सी लूक देणं टीव्हीवरील एका अभिनेत्रीला फारच महागात पडलं. त्यामुळे तिला सोशल मीडियावर बरंच ट्रोल व्हावं लागलं. तसेच वर्षभर तिला लाईमलाईटपासून दूर रहावं लागलं. ‘सपना बाबूल का बिदाई’ या मालिकेत साधनाची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सारा खान तिच्या ओठांच्या सर्जरीमुळे चर्चेत आली.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत साराने ‘लिप फिलर’चा प्रयोग म्हणजे मूर्खपणा ठरल्याची कबुली दिली. सारा म्हणाली की, ‘मला आयुष्यभर ‘बिदाई’मधील साधीसुधी साधना बनून राहायचं नव्हतं. सारा खान म्हणून मला माझी ओळख हवी होती.

माझ्या भूमिकेप्रमाणेच लोक माझ्या नव्या लूकलाही पसंत करतील अशी अपेक्षा होती. त्यामुळे मी लिप फिलरचा प्रयोग स्वत:वर करताना फारसा विचार केला नाही. पण तो निर्णय चुकीचा ठरला आणि मलासुद्धा माझा नवीन लूक अजिबात आवडला नाही.

_MPC_DIR_MPU_II

ते माझ्या चेहऱ्यावर इतकं वाईट दिसत होतं की, मला स्वत:ला आरशात बघायची इच्छा राहिली नव्हती’.

याआधी अनेक अभिनेत्रींनी लीप फिलरचा प्रयोग केला असून काही जणींचा तो प्रयोग फसल्याची देखील उदाहरणे आहेत. कलाविश्वातील अनेक अभिनेत्री आकर्षक दिसण्यासाठी ‘लिप फिलर’चा पर्याय निवडतात.

ओठांच्या सर्जरीपेक्षा हे कमी खर्चिक आणि काही वेळापुरतं टिकणारं असतं. लिप फिलरमुळे ओठांच्या आकारात बदल होतो आणि नेहमीपेक्षा ते थोडे जाड दिसू लागतात. मात्र हा बदल ठराविक कालावधीपुरता असतो. त्यानंतर ओठांचा मूळ आकार परत येतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.