AIMIM : पिंपरी चौकात अशोकस्तंभ उभारा

एमपीसी न्यूज – पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर चौक (AIMIM ) येथे अशोकस्तंभ उभारण्याची मागणी एमआयएमआयएमने पालिकेकडे केली आहे.

याबाबत शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ.बाबाबासाहेब आंबेडकर पिंपरी चौक हे पिंपरी -चिंचवड शहराचे मध्यवर्ती व मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसृष्टी स्मारक देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणीच होत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.

Pune : पुण्यात गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

अशोकस्तंभ हे देशाचे राष्ट्रीय प्रतीक आहे. भारतरत्न डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांनी अशोकस्तंभ हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक बनवण्यासाठी प्रयत्न करून ते मंजूर करून घेतले. यामुळे डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर स्मारका (AIMIM ) समोरील पिंपरी चौक येथे अशोक स्तंभ बसवण्यात यावा. अशोकस्तंभ या ठिकाणी बसवल्यास शहराच्या लौकिकात भर पडणार आहे. शहरवासीयांसाठी हे आकर्षणाचे केंद्र बनणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.