Pune : पुण्यात गुरुवारी ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – वडगाव जलकेंद्र येथील विद्युत वाहिनीच्या अत्यावश्यक (Pune) देखभाल दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून गुरुवारी (दि.11) करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव जलकेंद्र आणि राजीव गांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत बंद राहणार आहे.

त्यामुळे गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर सिंहगड रस्ता आणि सहकारनगर परिसराला उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

PCMC : कारवाई विरोधात फेरीवाल्यांचे हातगाडीसह चक्काजाम आंदोलन

हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग दोन वरील परिसर, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर आणि दाते बस थांबा परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार असल्याची (Pune) माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.