Airtel 5G Plus : पुण्यातील ‘या’ भागांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्येही एअरटेल 5G प्लस सेवा उपलब्ध

एमपीसी न्यूज – दूरसंचार सेवा पुरविणारी एअरटेल कंपनी हळूहळू देशाच्या विविध भागांमध्ये आपली 5G सेवा सुरू करत आहे. दूरसंचार कंपनीने पुणे शहरातील काही भागांसह पिंपरी-चिंचवडमध्येही Airtel 5G Plus सेवा सुरू केली आहे.

एअरटेलचे 5G नेटवर्क आता कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, बाणेर, हिंजवडी, मगरपट्टा, हडपसर, खराडी, मॉडेल कॉलनी, स्वारगेट आणि पिंपरी चिंचवड येथे वापरता येणार आहे. कंपनी आपले नेटवर्क वाढवेल आणि अखेरीस त्याची सेवा संपूर्ण शहरात उपलब्ध आहे, असे कंपनीने जाहीर केले आहे.

एअरटेल ग्राहकांना 5G सेवा वापरण्यासाठी नवीन सिम खरेदी करण्याची आवश्यकता नाही, कारण सध्याचे एअरटेल सिम कार्ड 5G सक्षम आहे. 5G सक्षम डिव्हाइसेस असलेले ग्राहक रोलआउट अधिक व्यापक होईपर्यंत कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता त्यांच्या क्षेत्रातील एअरटेल 5G Plus नेटवर्क वापरू शकतात. Airtel 5G Plus वापरकर्त्यांना HD व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टिपल चॅट्स, झटपट फोटो अपलोड यासह बऱ्याच काही सुविधा उपलब्ध असणार आहेत.

भारतातील एअरटेल 5G Plus शहरे

Airtel 5G Plus सेवा आता दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, सिलीगुडी, नागपूर, वाराणसी, पानिपत, गुरुग्राम, गुवाहाटी, पाटणा, लखनौ, सिमला, इंफाळ, अहमदाबाद, गांधीनगर, विझाग आणि पुणे येथे उपलब्ध आहेत.

Mann Ki Baat Live : पाहा लाईव्ह… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’!

एअरटेलची 5G सेवा या वर्षाच्या अखेरीस सर्व मेट्रो शहरांमध्ये, 2023 मध्ये संपूर्ण शहरी भारतात आणि मार्च 2024 पर्यंत संपूर्ण भारतात उपलब्ध होईल.

एअरटेल 5G Plus सेवा शुभारंभ प्रसंगी बोलताना, महाराष्ट्र आणि गोव्यातील भारती एअरटेलचे सीईओ जॉर्ज मॅथेन म्हणाले, “एअरटेल ग्राहकांना आता अल्ट्राफास्ट नेटवर्कचा अनुभव घेता येईल आणि सध्याच्या 4G स्पीडच्या तुलनेत 20-30 पट जास्त वेगाचा आनंद घेता येईल.”

एअरटेल थँक्स ॲप

एअरटेलने त्यांचे थँक्स ॲप देखील अपडेट केले आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा स्मार्टफोन 5G सेवांना सपोर्ट करतो की नाही हे तपासणे सहज शक्य होऊ शकते. ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या भागात Airtel 5G Plus सेवा उपलब्ध आहे की नाही हे देखील तपासता येऊ शकते. तुमच्या क्षेत्रात 5G सेवा वापरण्यासाठी 5G-सक्षम डिव्हाइस असणे महत्त्वाचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.