Akurdi News : कॉलवर गेलेल्या मार्शललाच शिवीगाळ व मारहाण

एमपीसी न्यूज – पोलीस निंयत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारीच्या कॉलची पुर्तता करण्यासाठी गेलेल्या पोलीस मार्शल यांनाच एकाने मारहाण व शिवीगाळ केली आहे.(Akurdi News) हा प्रकार शनिवारी (दि.24) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आकुर्डी येथील संभाजीनगर परिसरात घडली.

याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन विष्णू जगताप (वय 31) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून संजय उत्तम कदम (वय 49 रा.संभाजीनगर, आकुर्डी) याचा अटक केली आहे.

Srujan Nritya Mahotsav : तळेगावच्या सृजन नृत्यालयाच्या रौप्यमहोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व पोलीस शिपाई केंद्रे हे पोलीस नियंत्रण कक्षाकडून आलेल्या तक्रारीच्या कॉलची पुर्तता करण्यासाठी मार्शल तिथे गेले. यावेळी आरोपी व दुसऱ्या व्यक्तीमध्ये वाद सोडवत असताना आरोपीने थेट फिर्यादी यांना च शिवीगाळ करत माराहाण कऱण्यास सुरुवात केली.(Akurdi News) यामध्ये फिर्यादी जखमी झाले. यावरून आरोपीला अटक करत त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला असून निगडी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.