Ajit Pawar : संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयास भेट

एमपीसी न्यूज-पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा (Ajit Pawar)  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला.अजित पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळात वर्णी लागणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.त्याच दरम्यान पुणे स्टेशन येथील पुणे जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयास अजित पवार यांनी भेट दिली.अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्यासह अन्य संचालकासोबत होणार्‍या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.

Maharashtra : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण पोषक आहार देणार – दीपक केसरकर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा सहकारी बँकेत 32 वर्षापासून काम करत होते. या दरम्यान आशिया खंडातील एक नंबर बँक म्हणून नावारूपास आली.पण उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाचा कारभार वाढला आहे.

त्यामुळे पक्ष संघटनेसाठी वेळ आणि उपमुख्यमंत्रीपदाला न्याय देण्यासाठी अजित पवारांनी सहकारी बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.मात्र अजित पवार दर महिन्याला बँकेचा आढावा घेणार असल्याच स्पष्टीकरण पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी (Ajit Pawar)  दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.