Ajit Pawar : मी दिल्लीला गेलो नाही एवढेच सांगा…

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Ajit Pawar) सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून प्रतोद नियुक्तीवरून शिंदे गटाला जोरदार झटका दिला आहे. भरत गोगावलेंची प्रतोदपदी केलेली नियुक्ती अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे. तसेच तत्कालीन राज्यपालांच्या भूमिकेवर देखील न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तरीही निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागला. 

Chinchwad : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतले हृदयविकारापासून बचावाचे धडे

या सर्व घडामोडीनंतर नाशिक येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुणे विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी अजित पवार यांना राज्यातील सत्तासंघर्षांबाबत विचारले असता ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत जोपर्यंत वाचण्यास मिळत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही. तसेच मी लातूरमध्ये काल जी भूमिका मांडली. त्याप्रमाणेच घडले  आहे. अस म्हणत अजित पवार गाडीत बसत असताना नो कॉमेंट्स (Ajit Pawar) म्हणाले आणि गाडी थोडी पुढे जातच मी दिल्लीला गेलो नाही, एवढच सांगा असे अजित पवार अस म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.