Chinchwad : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतले हृदयविकारापासून बचावाचे धडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका, वायसीएम रुग्णालय, स्मार्ट सिटी व अखिल भारतीय भूलतज्ञ संघटना (Chinchwad) (सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्ट) शाखेच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अजंठा नगर येथे हृदयविकाराच्या झटक्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या व्यक्तीचे प्राण कसे वाचवायचे याचे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग घेतला.

आरोग्य जनजागृती कार्यक्रमातंर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत हृदयविकाराचा झटका, शॉक, अपघात इ. मार्गदर्शक तत्त्वांनुसार सीपीआर / सीओएलएस कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये वायसीएम रुग्णालयाचे उपअधीक्षक तथा भूलतज्ज्ञ मा. डॉ. उज्ज्वला अंदुरकर, मा. डॉ. मनीषा सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष प्रशिक्षण देवून विद्यार्थ्यांना “अवयव दान” या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य शशिकांत साबळे, गटनिदेशक ए. एस. मोरे, एस. बी. पावडे, शिल्पनिदेशक डी. एस. वानखेडे, ऐवले,  गुरव यांच्यासह मनपा अधिकारी व स्मार्ट सिटीचे प्रतिनिधी बिनीश सुरेंद्रन, जस्टीन मॅथ्यू, किरण लवटे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Railway News : मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय; अनेक रेल्वेगाड्या तासंतास रेल्वे स्थानकात अडकल्या

सहभागी (Chinchwad)  विद्यार्थ्यांना मॅनेक्विनवर प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक नागरिकाला जीवनरक्षक बनविणे हेच ध्येय समोर ठेवून अॅनेस्थेसियोलॉजिस्टद्वारे सामान्य नागरिकांसाठी विनामूल्य जागरूकता कार्यक्रम घेण्यात येतो. प्रत्येक नागरिक जीवन वाचवू शकतो. या उद्देशाने सोसायटी ऑफ अॅनेस्थेसियोलॉजिस्ट पिंपरी चिंचवड (एसएपीसी) इंडियन सोसायटी ऑफ अॅनेस्थेसियोलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कंप्रेशन ओन्ली लाईफ सपोर्टबाबत जनजागृती करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.