Pune : यंदाची दिवाळी अजित पवार यांना दुर्दैवाने एकट्याला साजरी करावी लागेल : प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – यंदाची दिवाळी अजित पवार यांना दुर्दैवाने एकट्याला साजरी करावी लागेल अस वाटत आहे. पण पुढील दिवाळी अजित पवार हे कुटुंबासोबत साजरी करतील अशी अपेक्षा करुयात, अशा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune) यांना टोला लगावला.

Hinjawadi : भर रस्त्यात कंटेनर उभा करून चालक गेला झोपी, मागून आलेल्या  गाडीची धडक, एकाचा मृत्यू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यानी काल शरद पवार यांची भेट घेतली. त्याबाबत प्रकाश आंबेडकर यांना पुण्यात (Pune) पत्रकारांनी विचारले असता त्यावर त्यांनी भूमिका मांडली.  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारला 2 जुलै रोजी पाठिंबा दिल्याच्या घटनेला आज 15 दिवसांचा कालावधी होत आला आहे.

या पंधरा दिवसात अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना मंत्री पद देखील मिळाले. पण त्याच दरम्यान अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले.

त्या सर्व घडामोडी दरम्यान काल मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या मंत्र्यानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे मागील पंधरा दिवस एकमेकावर आरोप प्रत्यारोप करणारे नेते शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने अनेक चर्चाना उधाण आले.

त्या भेटीबाबत पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की,उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यंदाची दिवाळी दुर्दैवाने एकट्याला साजरी करावी लागेल अस वाटत आहे. पण पुढील दिवाळी अजित पवार हे कुटुंबा सोबत साजरी करतील अशी अपेक्षा करुयात, अशा शब्दात अजित पवार यांना टोला लगावला.

राज्य सरकारच पावसाळी अधिवेशन सुरू झाल असून काय अपेक्षा आहेत.त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की,पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काल एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद झाली.त्या पत्रकार परिषदेत शेतकरी सर्वात शेवटी होता. या सरकारच्या रेकॉर्डमध्ये शेतकरी कुठे ही दिसत नाही. त्यामुळे हे खिसे भरणार सरकार असल्याच सांगत शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारवर त्यांनी टीका केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.