Akurdi News : ‘डी वाय पाटील फार्मसी’च्या विद्यार्थिनींचे मॉडेल राज्यात प्रथम

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील डिप्लोमा कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींचे मॉडेल राज्यात प्रथम आले आहे. भक्ती पवार आणि सौंदर्या पडवी या दोन विद्यार्थिनींनी राज्य स्तरावरीय ऑनलाईन मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धेत सहभाग घेतला होता. या विद्यार्थिनींनी ‘फार्मसिस्ट- कोरोना वॉरियर्स’ या विषयावर मॉडेल बनवले होते.

प्रेझेंटेशन मॉडेलमध्ये फार्मसिस्ट कोरोनाच्या काळात एका योद्धा सारखा सर्वांना सहकार्य करत असल्याचे मॉडेल सुंदर स्वरूपात सादर केले होते.

ए. एम.  मेमोरियल फार्मसी कॉलेज आणि गंगवाल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये एकूण 85 संघांनी सहभाग घेतला होता.

अडीच हजार रोख आणि प्रशस्तीपत्र, असे या स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप आहे. स्पर्धेकरिता स्मिता मानकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त मंत्री तेजस पाटील, प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.