Alandi News: एकमेकांच्या घरात घुसून मारहाण; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – एका महिलेच्या पतीचे आणि शेजारी राहणा-या महिलेचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून वडगाव रोडवरील झोपडपट्टीत आळंदी येथे एकमेकांच्या घरात घुसून मारहाण झाली. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास घडली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पतीचे शेजारी राहणा-या महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यातून शेजारी राहणा-या महिलेच्या घरातील लोक झापले असताना एका महिलेने दरवाजावर लाथा मारून जोरात दरवाजा वाजवला. घरातील महिलेने दरवाजा उघडला असता घरात जबरदस्तीने घुसून घरातील महिलेला लाथाबुक्क्यांनी, हाताने मारहाण केली. महिलेच्या केसांना धरून बाहेर ओढत नेऊन विटा फेकून मारल्या. यात घरातील महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी घरातील महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानंतर संशय घेणा-या महिलेच्या घरात घुसून संशय घेणा-या महिलेला, तिच्या सासू आणि जावेच्या मुलीला हाताने, लाथाबुक्क्यांनी, पोटावर, पाठीवर मारहाण केली. विटा फेकून मारून घरातील टीव्ही फोडला. तसेच शिवीगाळ आणि दमदाटी केली. याप्रकरणी संशय घेणा-या महिलेने चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.