Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,आळंदीचे प्रमुख विश्वस्त पदी ॲड राजेंद्र उमाप यांची निवड

एमपीसी न्यूज-श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,(Alandi )आळंदी विश्वस्त कमिटीची माहे जानेवारी 2024 या महिन्याची मासिक सभा आज दि.16 रोजी संस्थानचे पुणे कार्यालयात संपन्न झाली.
या सभेत दि.17 जानेवारी  ॲड राजेंद्र उमाप ,विश्वस्त यांची  श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी मा.प्रमुख विश्वस्त योगेश देसाई ,विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,विश्वस्त योगी निरंजननाथ व डॉ. भावार्थ देखणे हे उपस्थित होते.

Rahul Gandhi: मला धर्माचा गैरफायदा घेत नाही; हिंदू धर्माशी माझे वैयक्तिक नाते – राहुल गांधी

ॲड. राजेंद्र उमाप हे पुण्यातील प्रतिथयश विधिज्ञ (Alandi )असून महाराष्ट्र -गोवा बार कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष आणि चिंचवड देवस्थान  ट्रस्ट ,चिंचवड या देवस्थानचे विद्यमान विश्वस्त आहेत. तसेच जिजामाता महिला सहकारी बँक लि.च्या व्यवस्थापन समितीवर चेअरमन म्हणून काम पाहात आहेत.त्यांनी सन 2013 मध्ये पुणे बार असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.