Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी; आतापर्यंत 15 जणांना अटक

एमपीसी न्यूज : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Pune) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार या दोन्ही आरोपींना 20 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या दोन्ही मुख्य आरोपींनी बैठक घेत शरद मोहोळच्या हत्येचा कट रचल्याचा दावा पुणे पोलिसांनी कोर्टात केला.

काल मारणे आणि शेलार या दोन्ही आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती. आज कोर्टात हजर करत पोलिसानी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.

Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी ,आळंदीचे प्रमुख विश्वस्त पदी ॲड राजेंद्र उमाप यांची निवड

शरद मोहोळ मर्डर केसच्या अनुषंगाने दाखल असलेल्या कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 2/2004 भादवी कलम 120ब, 302,307,201,34 etc मध्ये काल
विठ्ठल (Pune) महादेव शेलार (वय 36, रा. मुळशी), रामदास नानासाहेब मारणे (वय 36, रा. मुळशी) यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तसेच इतर संशयितांकडे चौकशी चालू आहे. सदर गुन्ह्यात अद्याप पावेतो 15 आरोपीना अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.