Alandi : किरकोळ कारणावरून मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – ‘कार चालकाने कारचा हॉर्न वाजवला’ (Alandi) या कारणावरून एका व्यक्तीने कार चालकास मारहाण करून गळ्यातील दीड लाखाची सोन्याची साखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि. २१) रात्री आळंदी देवाची येथे घडली.

संजय भीमराव डोंगरे (वय 43, रा. बिबवेवाडी, पुणे) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 12/जीजी 7171) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi News : आळंदीमध्ये वारकरी भाविकांचा परतीचा प्रवास सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डोंगरे हे देहूफाटा (Alandi) आळंदी येथून त्यांच्या कारमधून प्रवास करत होते. त्यांनी कारचा हॉर्न वाजवला या कारणावरून आरोपीने डोंगरे यांना मारहाण केली. त्यांनतर डोंगरे यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी आरोपीने जबरदस्तीने चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.