Alandi crime News : सामाजिक सुरक्षा पथकाने आळंदी परिसरात 89 हजारांचा गुटखा पकडला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने आळंदी परिसरात दोन ठिकाणी कारवाई केली. त्यात 89 हजार 680 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखू जप्त केली आहे.

प्रितेश अनिल चोरडिया (वय 23, रा. आळंदी देवाची, ता. खेड) आणि अन्य एकाच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-मरकळ रोडवर धानोरे येथे चोरडिया ट्रेडर्स या दुकानामध्ये आणि मरकळ येथील लोखंडे बिल्डिंगमध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (दि. 16) दुपारी पावणे तीन वाजता छापा मारून कारवाई केली.

त्यात 89 हजार 680 रुपयांचा गुटखा व तंबाखू, 41 हजार 740 रुपये रोख रक्कम, 10 हजारांचा एक मोबाईल फोन, असा एकूण एक लाख 41 हजार 420 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथील सुवर्ण व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टोरंट अँड लॉजिंग या हॉटेलमध्ये कारवाई करून 13 हजार 970 रुपयांची देशी विदेशी दारू व बिअर बॉटल, 11 हजार 700 रुपये रोख रक्कम आणि पाच हजारांचा एक मोबाईल फोन, असा एकूण 30 हजार 672 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी अनिल भीमराव कोलते (वय 25, रा. शंकरवाडी दोन, ता. मावळ) आणि अन्य एकजणा विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.