Alandi : आळंदी जलशुध्दीकरण केंद्रास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल

एमपीसी न्यूज – आळंदी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये  कुरुळी  येथून भामा आसखेडच्या पाण्याचा प्रवाह कमी दाबाने ( Alandi) येत असल्याने त्याचा परिणाम आळंदी शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक ठिकाणी पाणीपुरवठा अवेळी होत आहे.
पाण्याचा  प्रवाह कमी दाबाने जलशुद्धीकरण केंद्राला येत असल्याने आळंदी नगर परिषदेने पाण्यासंदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
दि.1 मार्च आजपासून आळंदी खेड विभागात पाणी पुरवठ्याचे  8 टप्पे होणार आहेत.  शनिवार दि.2 रोजी आळंदी खेड विभाग उर्वरित 5 टप्पे पूर्ण होणार. तसेच त्या (दुसऱ्या)  दिवशी आळंदी हवेली विभागातील  पाणीपुरवठा 1 टप्प्यात होणार आहे. रविवार  दि.3 रोजी आळंदी हवेली विभागात उर्वरित  9 टप्पे  होणार आहेत.

31 डिसेंबर 2019 रोजी आळंदीचे तत्कालीन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी आळंदीत खेड विभाग व हवेली विभाग असे झोन करत दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला होता. त्यास 4 वर्षे पूर्ण झाली आहेत .त्यात सद्याचे नवीन संकट म्हणजे कमी कमी दाबाने होत असलेला पाणीपुरवठा.सद्यस्थितीत जलशुद्धीकरणा मध्ये पाण्याचा प्रवाह  कमी दाबाने येत असल्याने आळंदी शहरात नवीन वेळापत्रकानुसार दोन दिवसानंतर म्हणजेच आळंदीकर नागरिकांना तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा होणार ( Alandi)  आहे.

 

 

https://www.youtube.com/watch?v=9uFZI7ujChc

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.