Alandi : आयुष्यमान भव मोहीमे अंतर्गत आळंदी ग्रामीण रुग्णालयात भव्य आरोग्य मेळावा; 948 रुग्णांची तपासणी

एमपीसी न्यूज : आज केंद्र आणि राज्य सरकारच्या (Alandi) अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘आयुष्मान भव’ मोहीमे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे भव्य आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.

मेळाव्याचे उद्घाटन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पांडुरंग गावडे, अप्पर जिल्हाधिकारी तथा सहसंचालक( तांत्रिक ) बोरावके, मान.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागनाथ येमपल्ले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय वाघ, एन एच एम समन्वयक गणेश जगताप व नंदकुमार वडगांवकर, राहुल चव्हाण,संकेत वाघमारे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, रुग्णालयातील कर्मचारी वर्ग व पत्रकार बांधव उपस्थित होते. वरील मेळाव्यात तज्ञ डॉक्टर स्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, अस्थी रोग तज्ञ, शल्य चिकीत्सक, नाक कान घसा तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, दंत चिकित्सक सेवांच्या तज्ञ डॉक्टर्सनी उपस्थित राहून सेवा दिल्या.

Lonavala : बालकांसह महिलेचे अपहरण करून घरातील कामे करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

मेळाव्यामध्ये एकूण 948 रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. तसेच ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे’ या संकल्पने अंतर्गत 252 अठरा वर्षावरील पुरुषांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. त्या पैकी सहा रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली.

याशिवाय सर्व मान्यवरांच्या उपस्थित अवयव दान शपथ घेण्यात (Alandi) आली आणि अवयव दान करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या एकूण 20 अधिकारी आणि कर्मचारी यांनी स्वेच्छेने ऑनलाईन फॉर्म भरले.

वरील मेळावा मान उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.