World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द

एमपीसी न्यूज : विश्वचषकाला केवळ 4 दिवसांचा अवधी असताना ( World Cup 2023) पावसामुळे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान खेळवला जाणारा सराव सामना रद्द करावा लागला आहे.

गुवाहाटीमध्ये पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला आहे. तथापि, या सामन्याचा भारत आणि इंग्लंड संघांच्या नेटरनरेटवर कोणताही परिणाम होणार नाही.

विश्वचषकाआधी खेळाडूंना संबंधित देशाच्या वातावरणाचा व खेळपट्टीचा अनुभव यावा, तसेच खेळाडूंचा विश्वचषकासाठी आत्मविश्वास वाढावा यासाठी हे सामने खेळवले जातात.

Alandi : आयुष्यमान भव मोहीमे अंतर्गत आळंदी ग्रामीण रुग्णालयात भव्य आरोग्य मेळावा; 948 रुग्णांची तपासणी

भारताचा पुढील सराव सामना नेदरलँड सोबत 3 ऑक्टोबर ( World Cup 2023) रोजी तिरुवनंतपूरम येथे होणार आहे. दुसरीकडे तिरुवनंतपूरम येथे सुरु असलेला ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यातला सराव सामना पावसामुळे थांबविण्यात आला आहे.

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतात विश्वचषक होणार असून त्यासाठी सर्व 10 संघांचे भारतात यापूर्वीच आगमन झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.