Pune : उद्योगमंत्री उदय सामंत यांची शिवसृष्टीला भेट

एमपीसी न्यूज – पुणे दौऱ्यात (Pune) राज्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नऱ्हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली. शिवसृष्टीसारखा भव्य प्रकल्प उभारत असताना त्याला संपूर्णपणे आर्थिक सहाय्य करण्याची क्षमता ही राज्यांच्या उद्योगक्षेत्रात असून मी स्वत: राज्यातील उद्योगपतींना या प्रकल्पाची माहिती देत त्यांना मदत करण्याची विनंती करेल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

यावेळी शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, अमृत पुरंदरे, श्रीनिवास वीरकर, आमदार भीमराव तापकीर, उपजिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विभागीय अधिकारी अर्चना पाठारे, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

रत्नागिरी येथील थिबा पॅलेस या ठिकाणी एक संदर्भ वाचनालय उभारण्याची आपली संकल्पना असून त्यासाठी महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानने सहकार्य करावे, अशी इच्छा उदय सामंत यांनी बोलून दाखविली.

World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द

प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी याला तात्काळ मान्यता देत मदतीचा हात पुढे केला. तसेच ‘शिवसृष्टी’ला मदत करण्यासाठी पुणे (Pune) परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना तातडीने संपर्क करण्याच्या सूचना सामंत यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.