PCMC : महापालिकेच्या रूग्णालयात होणार ‘पेस्ट कंट्रोल’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरात महापालिकेचे 8 मोठी रूग्णालये, 33 दवाखाने असून या रूग्णालय, दवाखान्यात व परिसरात डास, माशा, ढेंकून, झुरळ, उंदीर, घुशी इत्यादींचा वावर होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने वेळोवेळी औषध फवारणी अर्थात पेस्ट कंट्रोल केले जाते. शास्त्रोक्त पध्दतीने पेस्ट कंट्रोल करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने निविदा प्रसिद्ध केली आहे. यासाठी 38 लाखांचा खर्च गृहीत धरण्यात आला असून तीन वर्षांसाठी हे काम ठेकेदाराला देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय विभागांतर्गत शहराच्या विविध भागांमध्ये 750 खाटांच्या क्षमतेचे सर्वात मोठे वायसीएम, 400 खाटांचे थेरगाव रूग्णालय, 100 खाटांचे नवीन भोसरी, 130 खाटांचे नवीन आकुर्डी रूग्णालय, 120 खाटांचे नवीन जिजामाता यासह 8 मोठी रूग्णालये असून 33 दवाखाने आहेत.

या रूग्णालये व दवाखान्यात बाह्य रूग्ण आणि अंतर रूग्ण विभागात उपचारासाठी दररोज शेकडो रूग्ण येत आहेत. त्यामुळे रूग्णालयाची व दवाखान्यांची स्वच्छता ठेवणे ही महापालिकेच्या वैद्यकीय विभागासह आरोग्य विभागाची आहे.

रूग्णालयात व परिसरात डास, माशा, ढेकूण, झुरळ, उंदीर, घुशी इत्यादींचा (PCMC) वावर होऊ नये, यासाठी शास्त्रोक्त पध्दतीने औषध फवारणी करणे गरजेचे असते.

World Cup 2023 : भारत आणि इंग्लंड सराव सामना पावसामुळे रद्द

त्यामुळे या कामासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने निविदा प्रसिध्द केली आहे. पात्र ठेकेदारांकडून 5 सप्टेंबरपर्यंत निविदा मागविल्या आहेत. हे काम ठेकेदाराला तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे. एका वर्षांसाठी जीएसटीसह 12 लाख 74 हजार 424 रूपये प्रमाणे तीन वर्षांसाठी 38 लाख 23 हजार 272 रूपये खर्च गृहीत धरण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.