Alandi : इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी 1 मे ला महाद्वार चौकात साखळी उपोषण

एमपीसी न्यूज : आळंदी येथील महाद्वार चौकात (Alandi) दि.1 मे रोजी पासून इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी इंद्रायणी सेवा फाउंडेशन, आळंदीकर ग्रामस्थ ,सर्व वारकरी संप्रदाय भाविक भक्त ,सामाजिक संस्था ,सर्व तरुण मंडळे,महिला मंडळे,इंद्रायणी उगम ते संगम पर्यंतचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने साखळी उपोषण होत आहे.

पवित्र इंद्रायणीचे पावित्र्य राखलेच पाहिजे. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे. इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यावर कारवाई झालीच पाहिजे.इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

 

Pune : वाणिज्य क्षेत्रात नोकरी, व्यवसायाच्या मोठ्या संधी – विवेक वेलणकर

 

जलपर्णी मुक्त इंद्रायणीसाठी हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित आधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.जलपर्णीमुक्त इंद्रायणीसाठी शासनाने त्वरित कार्यवाही सुरू केलीच पाहिजे. (Alandi) उगम ते संगम सर्व गावांमध्ये एस टी पी प्लँट झालेच पाहिजेत. या आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. याबाबत माहिती इंद्रायणी सेवा फाउंडेशन ने दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.