Chinchwad : सायन्स पार्कमध्ये शतकपूर्ती व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पीसीएमसी सायन्स पार्क तर्फे (Chinchwad) उद्या 1 मे रोजी शतकपूर्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायन्स पार्क येथे होणार असून या व्याख्यानासाठी प्रवेश विना शुल्क आहे.

पिंपरी-चिंचवड सायन्य पार्क फेब्रवारी 2013 पासुन कार्यरत असून गेल्या दहा वर्षात 22 लाखाहून आधिक राज्यातील व विविध परराज्यातील, विद्यार्थीं शिक्षकांसह नागरिकांनीही या सुविधेचा लाभ घेतला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सूविधेबरोबर सायन्य पार्क दवारे विज्ञान कार्यशाळा, विज्ञान व्याख्यान दुर्बिणीदवारे आकाश दर्शन व अन्य उपक्रम राबविले जातात.

तसेच दर महिन्याला पहिल्या तारखेस नामवंत व्याख्यातेचे जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी असे पर्यावरण सुरक्षा जलसंवर्धन व आरोग्य इत्यादी विषयावर व्याख्यान एप्रिल 2015 पासूून अखंडपणे सुरु आहे. व्याख्यानानंतर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील अशा नवोदित व प्रतीश यश कलाकारांदवारे शास्त्रीय सुगम संगीताचे सादरीकरण केले जाते. तसेच उपक्रमाचे प्रथम षुष्म खगोल अभ्यासक , लेखक डॉ . प्रकाश तुपे यांच्यादवारा गुंफण्यात आलेले होते.

Alandi : इंद्रायणी माता प्रदूषण मुक्तीसाठी 1 मे ला महाद्वार चौकात साखळी उपोषण

दि. 1 मे 2023 रोजीचे शतकपूर्वी व्याख्यान संस्थापक आंनद चोरडीया, द इको फॅक्टरी फाउंडेशन पुणे यांच्यादवारा शाश्वत विकास सहज शक्य कसा यावर आपले विचार श्रोत्यांपुढे मांडणार आहेत. (Chinchwad) व्याख्यानानंतर संगीता, संध्या, संदीप उबाळे , स्वप्नजा लेले यांच्या सुप्रसिध्द मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य आहे.

2015 पासुन अखंडपणे हा उपक्रम मध्यंतरी कोरोना काळात लॉकडाऊन कालवधीतही ऑनलाइन सुरु ठेवण्यात आला होता. तसेच असा हा उपक्रम अखंडितपणे सुरु राहावा म्हणून मराठी विज्ञान परिषद पुणे सायन्य पार्क यांच्यामार्फत संयुक्तपणे आय़ोजन करण्यात आले. (Chinchwad) यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवराचे सहकार्य लाभत आहे. प्रेक्षकाच्या मागणी , रुचीनुसार व्याख्यान व संगीत कार्यक्रमात नाविन्य आणण्यासाठी सायन्स पार्क संस्थापक प्रवीण तुपे सतत प्रयत्नशाील आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.