Lumpy vaccination : आळंदी येथील पशुसंवर्धन विभागा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 90 टक्के लंपी प्रतिबंधक लसीकरण

एमपीसी न्यूज : आळंदी येथील पशुसंवर्धन विभाग पशुवैद्यकीय दवाखान्या (श्रेणी 1जि. प.)अंतर्गत लंपी प्रतिबंधक लसीकरण 90 टक्के पूर्ण झाल्याची माहिती पशुधन विकास विभागाकडून देण्यात आली आहे.(Lumpy vaccination) सध्या 12 ते 13 जनावरांवर लंपीचे उपचार सुरू आहेत असून विविध ठिकाणी लसीकरणाचे काम चालू आहे.

आळंदी येथील पशुसंवर्धन विभाग पशुवैद्यकीय दवाखान्या (श्रेणी 1जि. प.)अंतर्गत आळंदी शहर, चऱ्होली खुर्द,धानोरे, वडगांव घेनंद,सोळू,आळंदी ग्रामीण अशी गावे येतात. या गावांमध्ये लंपी प्रतिबंधक लसीकरण 90 टक्के पूर्ण झाल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. बी.व्ही.अवघडे यांच्या सोबत कार्यरत असणारे सह कर्मचारी प्रदीप सोनवणे यांनी दिली. तसेच ते म्हणाले चऱ्होली येथील सुभाष थोरवे यांच्या कडील असणाऱ्या बैलाचा लंपी मुळे( 1 )मृत्यू झाला आहे.(Lumpy vaccination) सध्या 12 ते 13 जनावरांवर लंपीचे उपचार सुरू आहेत. सकाळी 7 ते सायं 6 पर्यंत विविध ठिकाणी लसीकरणाचे काम चालू असते.

Girl sexual assault : सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या वृद्धाला अटक

शेतातील गोठ्यांवर तसेच दारोदारी जाऊन शासना मार्फत जनावरांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे .यामध्ये सह कर्मचारी अनिल कुंभार ही कार्यरत असून सामाजिक काम म्हणून लसीकरणा साठी सहकार्य करणारे डी के रोकडे,अक्षय गवांडे,अनिकेत गिलबिले यामध्ये कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.