Alandi news : आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे कार्तिकी यात्रेनिमित्त नियोजन उत्तम – आमदार दिलीप मोहिते पाटील

एमपीसी न्यूज : आळंदी ग्रामीण रुग्णालयात गुरूवारी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट व मोड्युलर डिलिव्हरी रूम चे उदघाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. (Alandi news) आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे कार्तिकी यात्रेनिमित्त नियोजन उत्तम करण्यात आले आहे असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण कल्याण समितीची मिटिंग आयोजित केली होती.त्यात आमदार दिलीप मोहिते पा. यांनी रुग्णालयाच्या समस्या समजून घेतल्या व त्यासंदर्भात उपाय योजना करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.तसेच ते म्हणाले रुग्णालयाचे कामकाज समाधानकारक असून कार्तिकी यात्रेच्या संदर्भात नियोजन उत्तम केले आहे.

Sangvi News : मटण सूप मध्ये भात आढळल्याने वेटर चा खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक

डॉ.यम्पल्ले नागनाथ, आळंदी ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.ऊर्मिला शिंदे ,डॉ एस आर कोलाट व वरिष्ठ लिपिक कविता भालचिम यांनी रुग्णालया संबंधित माहिती व कार्तिकी यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या  नियोजनाबाबत माहिती त्यांना  दिली.यावेळी राष्ट्रवादी नेते डी डी भोसले पा. पोलिस निरीक्षक रमेश पाटील, पो.नि.शहाजी पवार, सतीश चोरडिया,शहर अभियंता संजय गिरमे,संतोष पवार,पांडुरंग गावडे इ.अनेक मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.