Sangvi News : मटण सूप मध्ये भात आढळल्याने वेटर चा खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक

एमपीसी न्यूज : मटण सूप मध्ये भात आढळल्याने वेटरचा खून करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (Sangvi News) अशी माहिती दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे यांनी दिली आहे. जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

आरोपींच्या बद्दल माहिती देताना, जाधव म्हणाले की, ” विजयराज वाघिरे, वय 23 वर्ष, रा. पिंपरीगाव याला आज अटक करण्यात आले आहे. तर त्याच्या साथीदाराला काल अटक करण्यात आले आहे. दोघांना आज पिंपरी कोर्टात हजर करण्यात आले होते व त्यांना 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.”

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात ब्रेस्ट कॅन्सर (मेमोग्राफी) मोफत तपासणीची शंभर शिबिरे घेणार – डॉ. भारती चव्हाण

या प्रकरणी विशाल रजाळे, वय 21 वर्षे, रा. सासूरवाडी हॉटेल च्या बाजूला काटे वस्ती पिंपळे सौदागर पुणे, मूळ रा. कोसगाव, तालुका भोकरदन जिल्हा जालना यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दोघे आरोपी काल बुधवार, 16 नोव्हेंबर रोजी रात्री 12 – 12.30 वा चे दरम्यान पिंपळे सौदागर मधील हॉटेल सासूरवाडी येथे जेवण्यासाठी गेले होते. तेथे जेवण करीत असताना मटणाच्या सुपमध्ये भात आहे. जेवण व सर्व्हिस चांगली नाही, असे म्हणून व त्यामुळे चिडून शिवीगाळ, दमदाटी करून दुसऱ्या आरोपीने त्याच्या हातातील लाकडी दांडक्याने जखमी सुभाष भवर, अजित मुटकुळे यांना मारहाण करून किरकोळ जखमी केले.(Sangvi News) तसेच वेटर मंगेश पोसे, वय 19 वर्षे याला “तुला लय माज आला आहे. हॉटेल मध्ये आल्या पासून तुला बघतोय. आज तुला संपवतोच असे मोठ्याने म्हणून त्याच्या डोक्यात जोरात लाकडी दांडके मारून गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.