Alandi : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागेवर स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळावी – शिवतेज मित्र मंडळ

एमपीसी न्यूज : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीमधून (Alandi) सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळणेबाबतचे निवेदन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीला शिवतेज मित्र मंडळातर्फे देण्यात आले. या संस्थान सेवेतून बरेच कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.

Pune : अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

तसेच, काही सेवानिवृत्त झाले आहेत. तरी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर आळंदीतील स्थानिक, बेरोजगार व होतकरू युवक व युवतींना नोकरी देण्यात यावी. असे शिवतेज मित्र मंडळाच्या (Alandi) वतीने व आळंदीकरांच्या वतीने हे निवेदन देवस्थान संस्थानला देण्यात आले. यावेळी देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, शिवतेज मित्र मंडळाचे पदाधिकारी आनंदराव मुंगसे, संभाजी शिवले, रमेश जाधव व शिवतेज मंडळाचे सदस्य उपस्थित होते. याबाबतची माहिती मंगेश तिताडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.