Pune : अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : वर्षाच्या सुरुवातीलाच (Pune) आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांची लांबच्या लांब रांग लागल्या आहेत. 2023 हे नववर्ष सुरू झाल्यानंतर आलेली ही पहिलीच तीही अंगारकी संकष्टी असल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी केली.

अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. मंदिरावर फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरिता झेंडू, गुलाब, शेवंती, कामिनी आदी फुले वापरुन पारंपरिक सजावट करण्यात आली होती.

Talegaon Dabhade : मावळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

पहाटे चार ते सहा या वेळात पंडित जितेंद्र अभ्यंकर (Pune) आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा सादर केली. त्यांच्यासह भाग्यश्री अभ्यंकर, तन्वी अभ्यंकर यांनी गायन केलं, तर केदार परांजपे, निलेश देशपांडे, अपूर्व द्रविड,आणि विशाल गंड्रतवार यांनी साथ संगत दिली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.