Chikhali : स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज : शरद नगर चिखली (Chikhali) येथील स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त, स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेकानंद जयंतीदिनी 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार महेश निंबाळकर, भक्त पुंडलिक पुरस्कार सागर भाई चव्हाण, तर जीवनगौरव पुरस्कार बंडोपंत ज्ञानदेव कोटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.

Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीमधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागेवर स्थानिक बेरोजगारांना नोकरी मिळावी – शिवतेज मित्र मंडळ

चिखली येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न (Chikhali) होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, नवी मुंबईचे उपयुक्त नितीन काळे, टाटा मोटर्सचे कार प्लांटचे हेड श्याम सिंग, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, माजी नगरसेवक एकनाथ पवार, सुनील लोखंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे रामराजे बेंबडे यांनी दिली. गेली अनेक वर्षापासून अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून विवेकानंदांचे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.