Pune Police : कोयता गॅंग विरोधात पोलिस अॅक्शन मोडवर; थेट दुकानदारालाच अटक

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखा एकच्या पथकाने थेट कोयता गँगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदारालाच अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी 105 कोयते जप्त केले आहेत. असे असले तरी जंगली महाराज रोडवरील खाऊ गल्लीत कोयत्याचा धाक दाखवून एका महिला विक्रेतीला धमकावल्याची घटना देखील ताजीच आहे. त्यामुळ कोयत्या बरोबरच त्यांचा गैरवापर करणाऱ्या गुंडवृत्तीला देखील पोलिसांनी आळा घालणे गरजेचे आहे.

हुसेन राजगारा असे दुकान मालकाचे नाव आहे. फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये राजगारा याचे दुकान आहे. मध्यप्रदेश मधून तो कोयते मागवयचा. पोलिसांच्या तपासात राजगारा हा पुण्यातील अनेक तरुणांना कोयते पुरवत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तरुणांकडून कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या 1 महिन्यात 8 ते 10 ठिकाणी या घटना घडल्या आहेत.

Chikhali : स्वामी विवेकानंद यांच्या 160 व्या जयंतीनिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

वरील कारवाई पोलिसांनी केली याचे कौतुकच आहे, पण (Pune Police) याबरोबरच आंबेगाव पठार येथे दोन तरुणांनी हवेत कोयते भिरकावीत, वाहनांवर आणि नागरिकांवर कोयते उगारून दहशत निर्माण केल्याची घटना ताजी आहे. याशिवाय जंगली महाराज रस्त्यावरील खाऊ गल्लीत विक्रेत्या महिलेला कोयत्याचा धाक दाखवून धमकावल्याचा प्रकार ही नुकताच घडला आहे. या घटनांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. पुरवठादार रोखला तसा आता कोयते हातात घेऊन नाचणारे ही आता गजाआड करणे गरजेचे आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.