Alandi : सिद्धबेट विकासापासून वंचीत राहू नये – शिवाजीराव आढळराव पाटील

एमपीसी न्यूज – आज दि.26 रोजी आळंदी मध्ये लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ निमित्त (Alandi) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आगमन झाले होते . आळंदी नगरपरिषद हद्दीतील शाळा क्रमांक 3 समोरील उर्वरीत जागेत उद्यान विकसित करणे, आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 4 येथील गार्डन विकसित करणे या  कामांचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले.

तसेच वॉर्ड क्रमांक 9 मधील रामदास वाळुंज ते जोगेश्वरी महिला मंडळ ते सुजित टेलर निवास ते सच्चिदानंद गिरी निवास ते अशोक तापकीर निवास पर्यंत ड्रेनेजलाइन व रस्ता याबाबतचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम पार पडला.

Pimpri : संदिप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराला प्रारंभ

त्याआधी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चिंबळी व केळगाव गावाचा दौरा केला. तसेच सिद्धबेट स्थानी भेट देऊन तेथील भागाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दौरा दरम्यान ते म्हणाले , संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यांचं बालपण या भूमी मध्ये गेले आहे. हा भाग विकासापासून वंचित राहू नये. हा मोठा ठेवा आहे. तो जतन करून ठेवला पाहिजे. माऊली व त्यांची भावंडे यांचा इतिहास येथे एखाद्या शिल्पाद्वारे  व अन्य माध्यमातून जनतेसमोर मांडता आला, तर नक्कीच त्याचा उपयोग होईल.

तसेच ते म्हणाले , चला एक पाऊल सिद्धबेटा कडे स्तुत्य कार्यक्रम आहे. यामुळे लोक सकाळी वॉकला ही येथे येतात. येथून स्फूर्ती घेतात. येथील विकास कामाबाबत काही सूचना असतील त्या द्याव्यात. त्यासंदर्भातील विकास कामाबाबत पाठपुरावा करून येथे विकास केला जाईल. तसेच त्यांचा हस्ते सिद्धबेटात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी इरफान सय्यद, भगवान पोखरकर,पांडुरंग वहिले,राहुल थोरवे,गणेश राहणे,गोरे,भुजबळ इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे विठ्ठल शिंदे,दिनेश कुऱ्हाडे इ.मान्यवर (Alandi) उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.