Alandi : जेथे स्वच्छता व निसर्गाचा वास असतो तिथे ईश्वरत्व असते – श्रीकांत भारतीय

एमपीसी न्यूज : विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी दि.7 मे रविवारी आळंदी येथील  सिध्दबेटा मधील पाहणी दौरा केला. (Alandi) यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे, तहसीलदार वैशाली वाघमारे,भाजपचे राम गावडे ,अमोल वीरकर व केळगावकर ग्रामस्थांनी तेथील विविध समस्यांबाबत माहिती देत,सिध्दबेट महती तसेच संत निवृत्ती, संत ज्ञानेश्वर, संत सोपान ,संत मुक्ताई यांची लिलाभूमी,कर्मभूमी याबाबत माहिती दिली. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून झालेल्या कामांबाबत माहिती दिली.

राम गावडे यांनी ह भ प जयराम बाबा भोसले यांच्या कार्याबद्दल यावेळी येथे माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपूर्वी तेथील दुरावस्थेसंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या निमित्ताने श्रीकांत भारतीय यांनी या स्थानास भेट दिली. सिध्दबेटामध्ये सोडण्यात आलेल्या ड्रेनेजच्या सांडपाण्याची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली. त्यावर उपाय योजना मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितल्या. सिध्दबेटा मध्ये कश्या प्रकारे व कोण कोणती विकास कामे होऊ शकतात याबाबत त्यांनी माहिती दिली.

इंद्रायणी नदी जलप्रदूषणाची पाहणी त्यांनी केली.(Alandi) आळंदी मध्ये झालेल्या साखळी उपोषणाची यावेळी माहिती देण्यात आली. इंद्रायणी नदी मध्ये जलप्रदूषण  होऊ नये यासाठी इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले. तसेच चला एक पाऊल सिध्दबेटाकडे अंतर्गत होत असलेल्या मोहिमेचा फायदा कश्या रीतीने झाला. याबद्दल माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे ,विलास काटे, विठ्ठल शिंदे यांनी दिली.सद्यस्थितीत होत असलेली तेथील स्वच्छता व वृक्षारोपणाबाबत माहिती कैलास केंद्रे यांनी दिली.

Pune : द क्विन मेरी टेक्निकल इस्टिट्यूटमध्ये रंगली अनोखी मैफल

श्रीकांत भारतीय यावेळी म्हणाले जिथे स्वच्छता व निसर्गाचा वास असतो तिथे ईश्वरत्व असते. माऊलीं या स्थानी लहानाचे मोठे झाले .त्यांचे अनेक प्रसंग येथे घडले. (Alandi) वारकरी संप्रदयात ते प्रेरणादायी व श्रद्धा वाढवणारे आहे.तसेच विकास आराखड्या ला देखील गतिमान केले पाहिजे.प्रशासकीय अधिकारी येथील विकास कामाबाबत सकारात्मक आहे.इंद्रायणी नदी जलप्रदूषणा बाबत पालकमंत्र्या सोबत बोलणार आहे. तसेच त्यांनी माऊलीं मंदिरास सदिच्छा भेट दिली.

देवस्थान तर्फे  त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पालिका व विविध संस्थांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अतुल देशमुख ,देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,तुकाराम माने, सचिन गायकवाड,ह भ प पुरूषोत्तम महाराज पाटील,किरण येळवंडे,आकाश जोशी,गणेश गरुड,किरण मुंगसे,  सचिन गिलबिले, सचिन पाचूंदे,संतोष गावडे,अशोक उमरगेकर, सदाशिव साखरे इ .मान्यवर उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.