Pune : मराठी विज्ञान परिषदेतर्फे बुधवारी डॉ. दीपक शिकारपूर यांचा गौरव

एमपीसी न्यूज : मराठी विज्ञान परिषद, पुणे, द इंन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटर व रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त (Pune) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, डिजिटल साक्षरता प्रसारक, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

11 मे हा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभर विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. कार्यक्रम राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला, बुधवार, दि. 10 मे 2023 रोजी सायंकाळी (Pune) 6 वाजता फिरोदिया सभागृह, द इंन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) पुणे लोकल सेंटर, अभियंता भवन, 1332, जंगली महाराज रोड, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

Alandi : जेथे स्वच्छता व निसर्गाचा वास असतो तिथे ईश्वरत्व असते – श्रीकांत भारतीय

ज्येष्ठ उद्योजक, मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ, संशोधक व आयसरचे चेअरपर्सन प्रा. डॉ. अरविंद नातू यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाचे घोषवाक्य ‘अभिनव तंत्रज्ञानाची यशोशिखरे’ या विषयावर करंदीकर आणि डॉ. नातू बोलणार आहेत. (Pune) गेली 36 वर्षे सातत्याने विज्ञानाचा मराठीतून प्रसार करणारे तसेच मराठी व इंग्रजी भाषेत 50 पुस्तकांचे लेखन करणारे डॉ. शिकारपूर यांचा मराठी विज्ञान परिषदेतर्फे मानपत्र देऊन सन्मान केला जाणार असल्याचे मराठी विज्ञान परिषद पुणेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.