Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा प्रमुखपदी योगी निरंजन नाथ यांची निवड

एमपीसी न्यूज : आज श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे (Alandi) विश्वस्त मंडळाची मासिक बैठक आळंदी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत सन 2024च्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पालखी सोहळा प्रमुख म्हणून संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Pune : शहरांमधील मोकळ्या जागांच्या संरक्षणावर संशोधन

या वेळी ऍड राजेंद्र बा. उमाप, प्रमुख विश्वस्त, डॉ. भावार्थ रा. देखणे, विश्वस्त आणि योगी निरंजन नाथ विश्वस्त उपस्थित होते. याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक (Alandi) ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.