Alandi : आळंदी शहरात जलाराम बाप्पाची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – आज दि.19 रोजी आळंदी येथे श्री जलाराम सत्संग मंडळाच्या (Alandi)वतीने जलाराम बाप्पाची 224 वी जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्ताने जलाराम सत्संग मंडळाच्या वतीने जलाराम बाप्पाच्या प्रतिमेची मिरवणूक श्री संतोषी माता मंदिर आळंदी या ठिकाणाहून बँड बाज्याच्या निनादात निघाली.

या मिरवणुकीत गुजराती बांधव आणि भगिनी यांनी वाद्यांच्या (Alandi)तालासुरात गुजराती नृत्य व दांडिया नृत्य केले. या मिरवणुकीत जलराम मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष व मंदिराच्या निर्मितीचे प्रमुख मगनलालजी राजा यांची प्रतिमाही ठेवण्यात आली होती.

या मिरवणुकीने शहरातील ग्रामस्थांची मने वेधून घेतली. या मिरवणुकीचे स्वागत व जलाराम बाप्पाच्या प्रतिमेची पूजन आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व पोलीस आधिकारी मच्छिंद्र शेंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तदनंतर नगरपालिका चौकात आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तसेच जैन संघ आळंदीचे अध्यक्ष व ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश काका वडगांवकर यांनी मिरवणुकीचे स्वागत करून जलाराम बाप्पाच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.

Bhosari : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

तसेच नगरपालिकेतील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेलाही पुष्पहार घालून पूजन केले. तसेच जलाराम सत्संग मंडळांच्या विश्वस्तांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. तदनंतर ही मिरवणूक पुढे माऊलींच्या प्रवेशद्वाराजवळ आली. त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज संस्थान च्या वतीने माऊली वीर यांनी मिरवणुकीचे स्वागत करून जलाराम बाप्पांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले.

मंडळाच्या वतीने माऊलीच्या समाधीला पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर , शारदाताई वडगावकर (माजी नगराध्यक्षा आळंदी,तसेच अनिल वडगावकर, नंदकुमार वडगावकर( आळंदी काँग्रेस शहराध्यक्ष) तसेच वडगावकर कुटुंबीय या मिरवणुकीत सहभागी झाले होते .

आळंदी शहरात नेहमीच गोरगरिबांना तसेच आळंदीतील वारकरी सांप्रदायातील गरजूंना मोठ्या उत्साहाने व आनंदाने अनेक वर्षे अन्नदान करणारे हे जलाराम सत्संग मंडळ समाजसेवेच्या कार्यामध्ये सुद्धा अग्रस्थानी आहे. आळंदी शहरात वारकरी व ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील वयोवृद्ध व्यक्तींच्या डोळ्यांसाठी मोफत उपचार करणारे व वेळप्रसंगी डोळ्याचे मोफत ऑपरेशन करणारे जलाराम सत्संग मंडळ पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हे जलाराम सत्संग मंडळ नेहमीच समाजसेवेचे व्रत धारण करत आलेले आहे. आणि अशा या जलाराम बाप्पाच्या भव्य मिरवणुकीत महाराष्ट्रातून गुजराती बांधव जलाराम बाप्पांचे भक्त वआळंदीचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

तदनंतर या मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व मिरवणुकीची सांगता झाली .
या कार्यक्रमाचे संपूर्ण सुंदर नियोजन जलाराम मंडळाचे प्रमुख विश्वस्त धीरूभाई राजा, नारायण सोळंकी , नरेंद्र भाई चोटाई , दिनेश वरु , राजेश मदलानी, भारत पटेल, योगेश भाई शहा, चिराग राजा या प्रमुख विश्वस्तांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.