Alandi News : आळंदीत सायकल चोरी, दहा दिवसात दोन घटना

एमपीसी न्यूज : आळंदी मधील माऊली पार्क व माऊली दर्शन येथील या एकाच परिसरातील दोन रहिवाश्यांच्या सायकली चोरी गेल्या आहेत. (Alandi News) कॉम्प्युटर क्लास जवळील एका इमारतीच्या पार्किंग मधून एक सायकल 20 जानेवारी रोजी दुपारी चोरीला गेली. तर दुसरी सायकल माऊलीं दर्शन येथील इमारतीच्या पार्किंग मधून 28 जानेवारी रोजी चोरीस गेली.
दि.20 जानेवारी रोजी झालेली सायकल चोरीची घटना सी सी टी व्ही मध्ये कैद झाली आहे. तो चोर हा कॉम्प्युटर क्लास जवळ काही वेळ बसलेला होता. चोरी करताना त्याला कोण पाहत नाही याची खात्री करत त्याने कॉम्प्युटर क्लास जवळील एका इमारतीच्या गेट मध्ये आत मध्ये जाऊन सायकल चोरी (Alandi News) करत तो पसार झाला. ही घटना तेथील एका सी सी टी व्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे. तर दि.28 जानेवारी रोजी चोर सायकल चोरी करून सायकल चालवत पसार झालेली घटना एका सी सी टी व्ही मध्ये दिसत आहे.