Maval : युतीचं ठरलं, भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक; बाळा भेगडेंसाठी भाजप - शिवसेना एकदिलाने काम करणार

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील शिवसेना – भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं ठरलं ! असे म्हणत मावळचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे.

या बैठकीला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, विद्यमान आमदार बाळा भेगडे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, भाजप पुणे जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे, शिवसेना मावळ तालुका प्रमुख राजेश खांडभोर आदी प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शिवसेना मावळ तालुक्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांवर बाळा भेगडे यांनी सहमती दर्शवली व सर्व स्थानिक पातळीवरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन बाळा भेगडे यांनी दिले. तसेच खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील तालुक्यातील सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी हे सर्व एकदिलाने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार जोमाने करतील अशी ग्वाही दिली.
शिवसेना-भाजप युतीचा धर्म पाळून भविष्यातील युतीही अतूट व अभेद्य राहील असे भाजप पुणे जिल्हाअध्यक्ष गणेश भेगडे व शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.