Pune : लोकसभेसाठी युती न झाल्यास भाजपला फटका बसण्याची शक्यता- खासदार शिरोळे

एमपीसी न्यूज – युती व्हावी ही जशी आमच्या नेत्यांची इच्छा आहे तशी माझी देखील आहे, मात्र, युती नाही झाली तर मतांचे विभाजन होईल, आणि त्याचा फटका भाजपला बसू शकतो असे मत भाजप खासदार अनिल शिरोळे यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

शिरोळे म्हणाले की, लोकसभेसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. विरोधकांचा विचार केल्यास काँग्रेसकडून मोहन जोशी आणि राष्ट्रवादीकडून तुपे यांना उमेदवारी मिळू शकते. बाहेरून उमेदवार द्यायचा विचार झाल्यास पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव समोर असेल तर उत्तमच होईल.

मध्यंतरी खासदार संजय काकडे यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे वक्तव्य केले होते. त्याबद्दल शिरोळे यांना विचारले असता, विरोधात कोण आहे याबद्दल मी विचार करत नसून आपली निवडणुकीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या विकासावर बोलताना शिरोळे म्हणाले, " समस्यामुक्त शहराच्या दिशेने गेल्या चार वर्षात काम सुरू आहे. केंद्रातून निधी मिळत असून तो खालच्या स्तरापर्यंत पोहचत आहे. पुण्याच्या विकासाचे अनेक निर्णय घेतले असल्याने पुढील काळात पुणे स्मार्ट झाल्याचे दिसेल"

कर्नाटक आणि पालघर निवडणुकीमुळे अनेक निर्णय प्रलंबित

पुणे शहरातील अनेक निर्णय झाले असले तरी त्याबाबतच्या अडचणी सोडवण्यात कर्नाटक आणि पालघर निवडणुकीमुळे वेळ लागत असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले. मेट्रो, रिंगरोड, पुणे लोणावळा रेल्वे मार्ग, जायका प्रकल्प याबाबतचे निर्णय आणि अंमलबजावणीतील त्रुटी सोडवण्यात निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे अडथळा निर्माण होत आहे असे ता म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.