Maval : दिवाळीनिमित्त दोन हजार किलो मिठाईचे वाटप

एमपीसी न्यूज – नाणे मावळातील देवा गायकवाड आणि मित्र परिवार यांच्या वतीने मावळ तालुक्यातील आंदर मावळ आणि नाणे मावळतील सुमारे पन्नास पेक्षा जास्त ग्रामीण भागातील विविध वाड्या वस्त्यांमध्ये दिवाळीनिमित्त दोन हजार किलो मिठाईचे वाटप करण्यात आले.

परतीच्या पावसाने अनेक शेतकरी बांधवांच्या हातात आलेले भाताचे पीक उध्वस्त केले. अनेकांचे दिवाळे निघाले याची जान ठेवत त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते देवा गायकवाड यांनी राबवला असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक दुर्गम भागात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली असल्याचे बोलले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.