BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रोटरी क्लबच्या वतीने निर्माल्य दान करणा-या गणेशभक्तांना कंपोस्ट खताचे वाटप

गणेशोत्सवात रोटरीतर्फे 'निर्माल्य दान करा,कंपोस्ट खत मिळवा' उपक्रम

एमपीसी न्यूज – शहराला पाणीपुरवठा करणा-या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये. तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात या उद्देशाने रोटरी परिवारातील पाच क्लबने एकत्र येऊन यावर्षी देखील गणेशोत्सवात ‘निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’, हा उपक्रम राबविला. नागरिकांनी रोटरी क्लबच्या ‘निर्माल्य दान करा, कंपोस्ट खत मिळवा’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व रोटरी क्लबने मिळून एकूण 12 टन निर्माल्य जमा केले. तसेच पाच हजार कंपोस्ट खताच्या बॅगचे वाटप केले.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन, रोटरी क्लब ऑफ आकुर्डी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी-चिंचवड इंडस्ट्रीयल टाऊन, रोटरी क्लब ऑफ देहूगाव, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आणि शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या वतीने या वर्षी हा निर्माल्य संकलनाचा कार्यक्रम जाधव घाट रावेत येथे राबविण्यात आला. निर्माल्य संकलनासाठी रोटरी क्लब व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशनतर्फे वाहनव्यवस्था आणि निर्माल्यापासून खतनिर्मिती करणा-या यंत्राची व्यवस्था करण्यात आली.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे बाळासाहेब उ-हे, जसविंदर सोखी, कृष्णा वाघमारे, तेजस शेळके, कमलाकर गोसावी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे गणेश बो-हा, सचिन काळभोर, सुभाष वाल्हेकर, निलेश मरळ, जगन्नाथ फडतरे, शेखर चिंचवडे, राजेंद्र चिंचवडे, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे जिग्नेश अगरवाल आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांनी नागरिकांना नदीमध्ये निर्माल्य टाकण्यापासून परावृत्त करून कुंडातच निर्माल्य टाकण्यासाठी सांगितले.

नागरिकांना नदीबद्दल जिव्हाळा वाढावा, या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येतो. शहराला पाणीपुरवठा करणा-या नद्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ नये, तसेच आपल्या नद्या प्रदूषणमुक्त राहाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. मागील दोन वर्षांपासून रोटरी क्लब आणि इतर सामाजिक संस्था व लोकसहभागातून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वीपणे राबवला. तब्बल 12 टन निर्माल्य गोळा करून नदीमध्ये जाण्यापासून अडविले गेले. तसेच सुमारे पाच हजार कंपोस्ट खताच्या बॅगचे वाटप करण्यात आले.

दहा दिवस गणपतीचे असून हा गणेशोत्सव आनंद, उल्हासित वातावरणात साजरा झाला. गणपती पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचा असावा, जीव ओतून केलेल्या सजावटीमध्ये प्लास्टिकचा वापर नसावा. निर्माल्य हे नदीत न टाकता त्याचे घरच्या घरी कंपोस्ट करून घरच्या बागेमध्ये टाका. गणपती शक्यतो नदीमध्ये विसर्जित न करता हौदात अथवा घरच्या घरी विसर्जित करावा.कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या जिवंत जलस्रोत यांची परिस्थिती गंभीर आहे, पाणी हळूहळू संपत आहे. त्यामुळे आपण संस्कृती जपण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. आदर राखला पाहिजे. यासाठी रोटरी क्लबच्या सर्व पदाधिका-यांनी आग्रह धरला. पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि रहिवासी सोसायटी यांचे मार्फत निर्माल्य संकलन करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like